नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील जबरी चोरीमधील पाच आरोपींना नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.या आरोपींनी बिलोली,देगलूर,मुखेड,लिंबगाव व नांदेड ग्रामीण हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय पांडुरंग भारती यांच्या पथकाने केली.
मे महिन्यातील 10 रोजी दिलीप पेट्रोल पंपवरील कर्मचारी हा जमा रक्कम 8 लाख 43 हजार रुपये घेऊन जात असताना, आरोपींनी मिर्ची पूड डोळ्यात टाकून बँग लंपास केली होती.या प्रकरणी पोलिसांनी छडा लावला,असता नांदेड शहरातील राजू सत्यम जाधव त्याचा नातेवाईक नागेश पोचिराम गायकवाड या दोघास ताब्यात घेतले असता,दोघांनी या गुन्हयासह इतर गुन्ह्यातील आरोपाची कबुली दिली. त्यांच्यासोबत इतर गुन्हयात सहभागी असलेल्या आरोपीमध्ये अमोल बालाजी जाधव,जितेश बाबुराव ढगे दोघे ही राहणार मुगट,रामा व्यंकटी पवार रा.देगाव, गणेश कोतावर रा.होटाळ,गणपती देवकर रा.घुंगराळा,लक्ष्मण मोरे रा.मुदखेड व आकाश पवळे रा.जानापुरी या सर्व आरोपिकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पांडुरंग भारती यांनी सांगितले.