सात हजाराची लाच घेणारा कृषी अधिकारी जाळयात

क्राईम

नांदेड,बातमी24:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालबन योजनेचे मंजूर अनुदानाची रक्कम लाभार्थी यांना देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या माहूर येथील कृषी अधिकाऱ्यास एसीबीने अटक केली.ही कारवाई माहूर येथे गुरुवार दि.24 रोजी करण्यात आली.

किनवट येथील पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी तथा माहूर येथील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार सांभाळणारे आरोपी संजय एकनाथ घुमटकर याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालबन योजने अंतर्गत मंजूर असलेल्या विहीर बांधकामाची पाहणी केली.उर्वरित मंजूर असलेल्या योजनेची रक्कम तक्रारदाराच्या पत्नीच्या खात्यावर अदा करण्यासाठी संजय घुमटकर यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली होती.पडताळणीअंती आरोपी घुमटकर याने 7 हजार रुपये नगद स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.ही कारवाई माहूर तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत परिसरात करण्यात आली.ही कारवाईला पी. आय.ढवळे,संतोष शेट्ये,किशन चितोरे,एकनाथ गंगातीर्थ,शेख मुजीब यांच्या पथकाने केली.