फुटकळ रक्कम स्वीकारल्या प्रकरणी दोघांना अटक

क्राईम

नांदेड,बातमी24:- विवाह नोंदणी प्रमानपत्र देण्यासाठी 500 रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी फीस 500 रुपये व इतर पाचशे रुपये देण्याची मागणी केली होती. ही रक्कम लाचखोर लोकसवेक अर्धापुर येथील नगर पंचायत कार्यालय निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे याने बालाजी चांदू पाटोळे (सफाई कामगार) याने तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी अर्धापुर पोलीस। ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगनाथ आंतवार,एकनाथ गंगातीर्थ, गणेश केजकर,शेख मुजीब, विलास राठोड, सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.