कालच्या गोळीबार प्रकरणातील चार जण ताब्यात

क्राईम

नांदेड,बातमी24ःचार दुकानांवर गोळीबार करत दहशत माजविणार्‍या सहा पैंकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

रविवार दि. 4 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर आलेल्या सहा जणांनी जुना मोंढा परिसरातील रणजितसिंह मार्केट भागात दुकांनाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला. तसेच आरोपींनी गल्यातील दहा हजार रुपये काढून घेतले होते. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या भागातील वेगवेगळया दुकानांमधील सीसीटीव्ही फु टेज पोलिसांना मिळाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत रात्रीतून काही जणांना ताब्यात घेतले होते.

सोमवारी सकाळपर्यंत कालच्या घटनेतील चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु होता, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. पकडलेले आरोपी हे नांदेड शहरातील असून ते जुन्याच गँगमधील असल्याचे सांगण्यात येते.