पोलीस अधीक्षक मगर यांच्याकडून महत्वाची सूचना

क्राईम
नांदेड, बातमी24:- उत्तर प्रदेशातील आयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवार दि.5 रोजी आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजूकर टाकू नये,पुढील दक्षता म्हणून ओन्ली अडमिन असे सेटिंग करावे,असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
मंगळवारी दि.4 आगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे,की  आयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन बुधवारी होणार आहे.राम मंदिर उभारणी संदर्भात  सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाचा आदर करण्यात यावा.त्यामुळे कुणाच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह पोस्ट करू नये, अशा आक्षेपार्ह पोस्ट करणारावर नांदेड सायबर सेलची करडी नजर असणार आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला.
पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते,की  काही लोक धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने किंवा नकळत पोस्ट करू शकतील. त्यामुळे व्हाट्स अपचे ग्रुप चालविणाऱ्या अडमीन चालकांनी व्हाट्स अपच्या सेटिंगमध्ये जाऊन मॅनेज सेन्ट सेटिंग ओन्ली अडमीन असा अवलंब करावा, असे आवाहन मगर यांनी केले.