नांदेडमध्ये पुन्हा कुख्यात गुंडास पिस्टलसह पकडले

क्राईम

नांदेड, बातमी24ः नांदेडमध्ये गावठी पिस्टल व अवैध हत्याराचे नांदेड शहर हे माहेरघर बनले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या आरोपातील फ रार आरोपीस गावठी पिस्टल तीन काडतुसासह ताब्यात घेतले. ही धाडसी कारवाई पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

मागच्या महिन्यात नांदेड येथे सराईत गुन्हेगार विक्की चव्हाण यांच्या हत्येमधील फ रार असलेला आरोपी प्रदीप श्रीराम श्रावणे वय. 22 वर्षे रा. महालक्ष्मीनगर पुसद जि. यवतमाळ येथील हा नांदेडमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखे पथकाने मंगळवार दि. 8 सप्टेंबर रेाजी छत्रपती चौकात सापळा लावला, असता आरोपी प्रदीप श्रावणे हा पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली, असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व तीन काडतुसे मिळून आली.

विक्की चव्हाण यांच्या हत्येतील फ रार आरोपी म्हणून प्रदीप श्रावणे याची विमानतळ पोलिस ठाण्यात नोंद होती. पोलिस याच्यावर पाळत ठेवून होते. या आरोपीविरुद्ध दरोडा टाकणे, मोटारसायकल चोरी असे गुन्हे यापूर्वी सुद्धा नोंद आहेत. या प्रकरणी आरोपी प्रदीप श्रावणे याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, फ ौजदार आशिष बोराटे, शेख अब्दुल रब, मारोती तेलंग, दशरत जांभळीकर, विठ्ठल शेळके, रुपेश दारसरवाड, राजू पुल्लेवार हनुमान ठाकुर यांच्या पथकाने केली.