नांदेड, बातमी24ः सांगवी भागातील अंबा नगर येथे राहणार्या अनिल कांबळे यांचा आपसी वादातून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी आठ वाजेच्या सुमारास घडली. मागच्या आठ दिवसांच्या काळात नांदेड शहर व भोवताली तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत.
अंबा नगर भागात राहणार्या अनिल कांबळे यास पूर्व वैमनस्यातून तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले, असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक ननावरे यांनी दिली.
——
मागच्या आठ ते नऊ दिवसांच्या काळात तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये गँगवारवरून विक्की चव्हाण, त्यानंतर खडकपुरा भागातील युवकाची दिवसाढवळया हत्या व सोमवारी सायंकाळी अंबा नगर येथील खुनाची घटना घडली आहे. तर तीन दिवसांपूर्वी एका अपहणकर्त्याने 12 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. पळून जाणार्या आरोपीस पायावर गोळी घालून जखमी करावे लागले होते.