लोकप्रतिनिधी तब्बल 42 लाखांना फ सला; शिवाजी नगर पोलिसात तक्रार

क्राईम

नांदेड, बातमी24ः- लालच माणसाला लालची बनविते. त्यामुळे अनेक जण लालसेपोटी कधी जाळयात सापडेल हे सांगता येत नाही.अधिकारी व सामान्य माणूस सहज सापडतो. परंतु एखाद्या लोकप्रनिधी सापडणे अवघड किंवा तशी हिमत कुणी करत नाही. परंतु ऑनलाईनमध्ये कसला लोकप्रतिनिधी आणि कसला कोण याचे काही देणे-घेणे नसते. जाळयात आला तो फ सलाच समजा.अशीच गत झाली ती, लोहा पंचायत समिती सदस्याची या सदस्याला गॅस एजन्सी मिळवून देतो, म्हणून 42 लाख रुपयांना गंडा घातल्याची बाब समोर आली.

एलपीजी गॅस वितरण एजन्सीची डिलरशिप देतो, म्हणून लोहा तालुक्यातील शेवडी गणाचे पंचायत समिती कैलास जाकापुरे हे आमिष देण्यात आले. यासाठी दि. 11 जून ते 14 जुलै या कालावधीत जाकापुरे यांनी तब्बल 42 लाख 30 हजार 400 रुपये खात्यावर वर्ग केले. जाकापुरे हे नांदेड येथील शिवाजी नगर भागात राहतात. संदीपकुमार नावाच्या व्यक्तीने विविध क्रमांकाचा मोबाईल क्रमांक वापरून संवाद साधत राहिले. ते यात अलगदपणे जाळयात अडकत गेले. बनावट कागदपत्रे फे सबुकव्दारे दाखविली गेली.

यात मात्र शेवटपर्यंत काहीच हाती लागले नाही. यावरून फ सवणुक झाल्याचे जाकापुरे यांच्या लक्षात आले. यावरून त्यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्या गाठत फ सवणुकीची फि र्यादी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नरूटे हे करत आहेत.