नांदेड, बातमी24ः लोहा येथील एका बारा वर्षांच्या वर्षांच्या मुलाचे अपहरणार्या गुंडापासून त्या मुलाची पोलिसांनी सुखरुपने सुटका केली. या वेळी पोलिसांच्या दिशेने कुख्यात गुंड विकास हटकर याने गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी प्रतिउत्तरात केलेल्या गोळीबारात विकास हटकर याच्या पायात गोळी लागल्याने तो जायबंदी झाला. या प्रकरणी तीन जणांना ताब्या घेण्यात आले तर अन्य काही जण घटनास्थळावरून फ रार झाले. ही थरारक घटना निळा रोडवरील सम्राट हॉटेलसमोर घडली.
नांदेड शहर व भोवतालच्या परिसरामध्ये गुंडगर्दी व गॅगवारचे स्वरुप आले आहे. रविवारी रात्री विक्की चव्हाण याची हत्येनंतर गुरुवारी दिवसाढवळया एका इसमाचा खून करण्यात आला आहे. त्यापूर्वी एक दिवस अगोदर पिस्टल जप्त करण्यात आला होता. या तिन्ही घटना ताज्या असताना लोहा येथील एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्या मुलास निळा रोडवर आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिस आल्याचे पाहून विकास हटकर यांने गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी प्रतिउत्तर केलेल्या गोळीबारात विकास हटकर याच्या पायात गोळी लागली. त्यामुळे तो व अन्य एक जण पोलिसांच्या हाती लागले. अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चिखलीकर यांनी दिली. विकास हटकर याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे पंधराहून अधिक गुन्हे असल्याचे सांगण्यात आले.
——
सूचनाः यासंबंधीचे अधिक वृत्त थोडयाच वेळात