दिवसाढवळया सराफ ा दुकान फ ोडले; दरोडयाच्या घटनेने व्यापार्‍यात खळबळ

क्राईम

नांदेड, बातमी24ः शहरातील अण्णा भाऊ साठे चौकापासून जवळ असलेल्या दत्त नगर येथील एका सराफ ा ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवित पंधरा तोळे सोने लांबविला. या दरोडयाच्या घटनेने खळबळ उडाली, असून व्यापार्‍यांमधून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दत्त नगर भागात असलेल्या श्री. स्वामी समर्थ ज्वेलर्सवर साडे अकरा-बारा वाजेच्या सुमारास तीन जणांनी दुकानात घुसून शस्त्राचा धाक दाखवित आतून शटर लावून घेतले. या वेळी दरोडोखोरांनी व्यापारी मुक्तेश्वर शहाणे यांच्यावर शस्त्राने हल्ला करत तब्बल पंधरा तोळे लांबविले. या वेळी दरोडेखोरांनी खरेदीस आलेल्या ग्राहकांचे पंचविस हजार रुपये सुद्धा हिसकावून नेले. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांच्या तपासासाठी तैथके रवाना केली असल्याचे सांगण्यात आले.