अपहरणकर्ता गुंड विकास हटकर बीएसएफ मध्ये होता जवान

क्राईम

नांदेड, बातमी24ः कुख्यात गुंड विकास हटकर याने लोहा येथील एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती.पोलिसांना त्याच्यावर बंदुक चालवावी लागली. तेव्हा तो पोलिसांच्या हाती लागला.त्यामुळे त्या मुलाची सुद्धा सुखरुपणे सुटका करता आली. विशेष म्हणजे, हा गुंड सात वर्षे भारतीय सैन्य दलात बीएसएफ मध्ये नौकरीस होता.मात्र काही वर्षांपूर्वी तो पळून आला तो, पुन्हा गेलाच नाही. मागच्या तीन वर्षांच्या काळात त्याच्यावर 15 गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.

लोहा येथे राहणार्‍या शुभम गिरी या बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या मुलाच्या आईने लोहा पोलिसात तक्रार दिल्यानंतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेला. गुंड विकास हटकर याचा आवाज स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. भारती यांनी ओळखला होता.आरोपीच विकास हटकरच असावा, अशी त्यांना खात्री पटली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या हलचालीवर बारकाईने लक्ष ठेवले.

निळा रोडवरील महादेव नगर भागात असल्याचे खात्री पटली. पोलिस मागावर असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर तेथून पळून जात असताना स्थानिक गुन्हे शाखे पोलिस निरीक्षक चिखलीकर यांनी त्याच्या उजव्या पायावर गोळी घालून जायबंद केले. हा सगळा थरार प्रकार एखाद्या चित्रपटाला शोभावा असाचा होता.

विकास हटकर याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे पंधरा गुन्हे आहेत. तो गुंड होण्यापूर्वी भारतीय सैन्य दलातील बीएसएफ मध्ये नौकरीस होता. सात वर्षे नौकरी केल्यानंतर तो तेथून पळून आला. यास एकदा घेऊन जाण्यात आले. त्यानंतर तो पुन्हा पळून आला तो पुन्हा गेलाच नाही. त्यानंतर अशा चुकीच्या मार्गाला लागला. लुटमार करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण अशा विविध गुन्हयात तो मास्टरमाइंड झाला. अपहरणाच्या गंभीर गुन्हयात पोलिसांच्या शेवटी तो हाती लागलाच. त्याच्यासोबत या कटात असलेले सुरज मामीडवार, बंटी नवघरे यांचा ही समावेश आहे. अन्य दोन जण फ रार आहेत.