लाच घेतल्या प्रकरणी दोन कर्मचारी ताब्यात

क्राईम

नांदेड,बातमी24:-मुखेड पंचायत समिती येथील दोन कर्मचारी लाचेच्या प्रकरणात अडकले आहेत. ही कारवाई नांदेड येथे करण्यात आली.मागच्या पाच दिवसात जिल्हा परिषदेचे तीन कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अटक होण्याची ही दुसरी घटना आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले,की तक्रारदाराकडून कालबद्ध पदोन्नतीमधील मंजूर झालेल्या रक्कमेचा बिल मुखेड पंचायत समितीकडून पास करून देण्यासाठी आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र चांदोला कर्मचारी शेख शादुल हबीबसाब याने लाचेची रक्कम गजानन सूर्यकांत पेंढकर (सहायक लेखाधिकारी पंचायत समिती मुखेड हल्ली रा.भावसार चौक नांदेड ) याच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून पाच हजार रुपये घेताच पोलिसांनी रंगेहात पकडले.

या प्रकरणी पोलिसांनी शेख शादुल हबीबसाब व गजानन पेंढकर यास ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक धरमसिह चव्हाण,पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रकाश वांद्रे,पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे,हणमंत बोरकर,एकनाथ गंगतीर्थ,प्रकाश श्रीरामे,नीलकंठ यमूनवाड यांच्या पथकाने केली.