दुचाकीचा समोरा-समोर अपघात; 3 ठार

क्राईम

नांदेड,बातमी24ः किनवट शहरापासून दक्षिणेस पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटोदा गावाजवळील वळण रस्त्यावर दुचाकीची-समोरा-समोर अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना रविवार दि. 30 रोजी दुपारच्या सुमारास घडली.

किनवट तालुक्यातील इस्मालपुर येथील कुटुंब हे मोटारसायकलवर बसून शेख करीम खान हुसेन वय. 30 वर्षे, गौस अकबर शेख वय.29वर्षे,हासिनाबी शेख गौस वय 26 वर्षे व शेख सलीम शेख गौस वय.6 वर्षे हे चार जण एका दुचाकीवरून सोनाळा येथून किनवटकडे येत असताना समोरून येणार्‍या एका दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. या झालेल्या अपघातात शेख करीम खान हुसेन, शेख सलीम शेख गौस व अंकुश दत्तराम जाधव या3  मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या गणेश माधव चव्हाण व हासीनाबा शेख यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे.