कुख्यात गुंड विक्की चव्हाण खूनातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळयात; सिनेस्टाईन पाठलाग

क्राईम

नांदेड, बातमी24ः कुख्यात गुंड विक्की चव्हाण यांच्या हत्येतील मुख्य फ रार आरोपी कैलास बिगानिया यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. घटनास्थळावर पळ काढणार्‍या तिघांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर बडया घातल्या. ही कारवाई कधी करण्यात आली, हे मात्र सुत्रांकडून समजू शकले नाही.

शहरातील कौठा भागात राहणार्‍या गुंड विक्की चव्हाण याची हत्या ऑगस्ट महिन्यात गँगवारवरून झाली झाली होती.गोळया घालून धारदार शस्त्राने खून करून पार्थिक लिंबगाव हद्दीत फ ेकून देण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या कैलास बिगानिया मागच्या दोन महिन्यांपासून फ रार होता. आरोपी कैलास बिगानिया व त्याचे दोन साथीदार हे खंकीन परिसरातील एका खोलीत राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेताच कैलास बिगानिया, नितीन बिगानिया व दिलीप डाकोरे हे तिघे दुचाकीवर पळून होते. या वेळी पोलिसांनी पाठलाग करून तिघांना जेरबंद केले.विक्की चव्हाण खून प्रकरणात पोलिसांनी आठ ते दहा जणांना बेडया घातल्या आहेत.
——-
स्थानिक गुन्हे शाखेचे यश

विक्की चव्हाण खुनातील सर्वच्या सर्व मारेकर्‍यांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. कैलास बिगानिया व अन्य दोघांनी धाडसीपणे पोलिसांनी ताब्यात घेतले. जुना मोंढा येथे गोळीबार करणार्‍या सर्वच्या सर्व सहा आरोपींना सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या दोन्ही प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने जलदपणे आरोपींना ताब्यात घेतले.