पंधरा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचा कार्यकारी अभियंता जाळयात

क्राईम

 

नांदेड,बातमी24:-एका कार्यालयीन कर्मचाऱ्या थकीत रक्कम काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदमधील एका कार्यकारी। अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई मंगळवार दि.20 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले,की तक्रारदार कर्मचारी यांचे 2020 मधील थकीत पगार,सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम व महागाई भत्ता काढून देण्यासाठी लघुपाट बंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गणेशराव गुंडरे यांनी सर्व देयक काढण्यासाठी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. यातील 10 हजार रुपये गुंडरे यांनी यापूर्वीच स्वीकारले होते.उरलेले 15 हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

यावरून गुंडरे राहतात त्या शहाजी नगर येथे सापळा लावण्यात आला.यावेळी तक्रारदार कर्मचारी यांच्याकडून 15 हजार रुपयांची रक्कम स्वीकारतात पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी भाग्य नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.