लाच प्रकरणात तलाठी जाळयात

क्राईम

नांदेड, बातमी24ः मयत वडिलांच्या नावे असलेली शेत जमीन तक्रारदार तसेच भाऊ व बहिणीच्या नावे वारसा हक्क लावून देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच एक जणामार्फ त स्विकारल्याप्रकरणी तलाठी व त्याच्या खासगी इसमास पकडण्यात आले. ही कारवाई शनिवार दि.1 ऑगस्ट रोजी करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले, की मुखेड तालुक्यतील चांडोळा येथील तलाठी उदयकुमार लक्ष्मण मिसाळे याने तक्रारदाराकडून वारसा हक्क लावून देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती राहूल प्रल्हादराव परांडे रा. सावित्रीबाई फु ले नगर, याच्यामार्फ त नगद तीस हजार रुपये स्विकारले. या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहात पकडले.
ही कारवाई लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक विजय डोंगरे, राहुल पखाले, बालाजी तेलंग, गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.