नांदेड, बातमी24ः- दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू दि. 9 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास झाला असल्याचे कळविले.मात्र जिल्हा शल्यचिकित्यांच्या प्रेसनोटमध्ये त्या दोन रुग्णांचा मृत्यू दि. 11 रोजी झाला असल्याचे नमूद करण्यात आले. नेमका त्या दोन्ही रुग्णांचा मृत्यू नेमका कधी झाला. यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
भोकर येथील 33 वर्षीय महिलेचा तर बळीरामपुर येथील 28 वर्षीय तरुणाचा कोरोना मृत्यू कोरोनामुळे दि. 9 मे रोजी झाला असल्याचे सकाळी उपजिल्हाधिकारी असलेल्या नोडल अधिकार्यांनी कळविले होते. मात्र दि. 9 रोजी घडलेली घटनेची माहिती शनिवारी सकाळी देण्यात आली होती. उशिरा माहिती देण्यावरून प्रशासनाच्या अहवालाबाबत बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत बातमी24.कॉम ने मृत्यू दोन दिवसांपूर्वी आणि माहिती मात्र शनिवारी सकाळी या मथळ्याखाली वृत्त शनिवारी सकाळी प्रसिद्ध केले होते.
सायंकाळी आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या प्रेसनोटमध्ये मात्र कोरोनाबाधित भोकर व बळीरामपुर येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू दि. 11 रोजी झाला असल्याचे नमूद केले आहे. दोन बडया जबाबदार अधिकार्यांच्या माहितीमध्ये विसंगती पुन्हा एकदा समोर आली आहे. अशा बाब पहिल्यांदाच घडली, असून यापुर्वी सुद्धा असे प्रकार घडले आहेत. एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास ती माहिती त्याच दिवशी जनतेपर्यंत कळविणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे जनतेमधून अपेक्षा व्यक्त होत आहे.