सभापतीला पक्षात प्रवेश देणारा वंचित गटा-तटाच्या वाळवित!

ताज्या बातम्या

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः लोकसभा निवडणुकीत संबंध राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला काँग्रेसला पाणी पाजणार्‍या वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत मोठया अपेक्षा होत्या. मात्र दुर्दैवाने वंचित फ क्टर भोपळयातच गुंडाळला गेला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात बर्‍यापैकी राजकीय बारस धरलेल्या वंचितला दक्षीण-उत्तर अशी गटा-तटाची वाळवी लागल्याचे दिसून येत आहे.इतरांना पक्षात प्रवेश देणार्‍या वंचितच्या सर्व तरूण नेत्यांना सर्वप्रथम पोरकट वृत्तीतून बाहेर पडत प्रोढपणा दाखवावा लागणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितचे वादळ सगळीकडे घोंघावत गेले. सत्ता संपादन करण्याची ताकद या फॅ क्टरमध्ये निर्माण झाली होती. तशा आशा वंचित जात समुहासह विशेषःता बौद्ध समाजामध्ये मोठा आशेचा किरण उभा राहिला. मात्र शेवटी पालत्या घागरीत पाणी भरल्यासारखे झाले. नांदेड जिल्ह्यात वंचितमध्ये दक्षीण-उत्तर अशी दरी दुरावत आहे. यास फ ादर बॉडीमधील भाषणबाज व वैचारिक नेते असल्याचे भासवून देणार्‍या नेत्यांचे हात अशा कारनाम्यांना कारणीभूत ठरत आहेत.

मुदखेड येथील पंचायत समिती सभापती बालाजी सुर्यतळे यांचा रविवारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश झाला. मुदखेड तालुका नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षांकडे येत असताना बालाजी सुर्यतळे यांच्या प्रवेशासंबंधी खुद उत्तर जिल्हाध्यक्षांना कानोकान लागू दिले नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीस सभापती सुर्यतळे यांना घेऊन जात असताना उत्तर जिल्हाध्यक्षांना अंधारात ठेवले गेले. विशेष म्हणजे, आकोला येथे अ‍ॅड.आंबेडकर यांच्या भेटीस घेऊन जात असताना नांदेड शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह नांदेड दक्षीण जिल्हाध्यक्षांना फ ादर बाडीच्या नेते मंडळी घेऊन गेली.

यापूर्वी सुद्धा वेगवेगळया आंदोलनावरून धुसफु स उफ ाळून येते. पक्षामध्येच अलबेल नसल्याचे दिसून येत नाही.परिणामी इतर पक्षातील मंडळीही पक्षात येणार कसे असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे फ ादर बॉडीमधील प्रवक्त्यांनी पक्षाच्या सूचनेनुसार प्रसार माध्यमातून जनतेत पक्षाची बाजू मांडणे हा त्यांच्या कामाचा भाग समजून काम करत राहिल्यास दक्षीण-उत्तर असा सुप्त वाद ही होणार नाही.


——-
पक्ष पदाधिकार्‍यांच्या संवेदना बोचट
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपक जोंधळे यांचा मृत्यू झालेला असताना त्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीने पक्ष प्रवेश सोहळयाची पत्रकार परिषद घेतली. ज्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिवाचे रान करून काम केले अशा दिवंगत पदाधिकार्‍याचा अंत्यविधी होण्यापूर्वीच पत्रकार परिषदेचा थाट-माट लावला.