नऊ जणांचा मृत्यू तर सव्वा नऊशे बाधितांची भर

ताज्या बातम्या

 

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्ह्यात रविवारी आलेल्या अहवालात 927 बाधितांची भर पडली,असून 9 जणांचा बळी गेला आहे. तसेच 309 जनांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात 4 हजार 673 तपासण्या करण्यात आल्या.यात 3 हजार 616 निगेटिव्ह तर 927 जण बाधित झाले. आरटीपीसीआर चाचणीत 409 तर अंटीजनमध्ये 526 जण असे 927 जणांचा समावेश आहे. यात 445 जण हे नांदेड मनपा हदीमधील जणांचा समावेश आहे, तर उर्वरित 482 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. आजघडीला 5 हजार 377 जणांवर उपचार सुरू आहेत,यातील 59 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——–
नऊ जणांचा मृत्यू

मागच्या 24 तासामध्ये 9 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.यात सात पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.देगलूर तालुक्यातील भक्तापुर येथील 65 वर्षीय पुरुष, अर्धापुर तालुक्यातील बारसगाव येथील 54 वर्षीय पुरुष, सरपंच नगर येथील 61 वर्षीय पुरुष, नसीर रोड येथील 45 वर्षीय पुरुष,भूविकास कॉलनी येथील 75 वर्षीय पुरुष,राम नगर येथील 49 वर्षीय महिला,होळी येथील 73 वर्षीय महिला,दीप नगर येथील 62 वर्षीय पुरुष तसेच कलंबर येथील 75 पुरुषाचा समावेश आहे.त्यामुळे नांदेद जिल्ह्यात 648 जण मरण पावले आहेत.