शासन नियमांना अधिन राहून वेतननिश्चिती; हा तर बदनाम करण्याचा डावः डीएचओ डॉ. शिंदे

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून माझ्या विरोधात चुकीचा विपर्यास काढून ते निवेदन व उपोषण केले गेले, लोकशाहीमध्ये निवेदने व उपोषण करण्याचा अधिकार आहे. यासंदर्भाने आदर आहे. मात्र माझ्यावर ते आरोप करण्यात आले, त्यात कुठेही अनियमितता झालेली नाही. शासनाच्या नियमांना अधिन राहून वेतननिश्चिती झाली आहे. यात कुठेही गैरप्रकार झालेला नाही. मात्र या प्रकरणात तथ्य नसताना गोवण्याचा प्रकार केला जात आहे.हा प्रकार म्णहजे बदनामी करण्याचा डाव आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.

या विषयी बोलातना डॉ. शिंदे म्हणाले, की माझी निवड ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग एक अधिकारी म्हणून झाली आहे. शासनाने पदस्थापना जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद नांदेड येथे दि. 3 मार्च 2011 रोजी दिली. त्या वेळी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हाश्मी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर वर्ग एक अधिकारी मी असल्याने मला प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता. त्या वेळी दि. 16 मे 2011 च्या आदेशान्वये म्हणजे नियमानुसार वर्ग 1 ची वेतननिश्चिती केली आहे. वेतन निश्चिती करण्याचा अधिकार हा डीएचओ यांना शासनाने दिलेला आहे. मात्र त्या दरम्यान अस्थायी कालावधीची कोणतीही रक्कम घेतलेली नसल्याचे डॉ. शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

वेतन पडताळणी समिती औरंगाबाद येथील वेतननिश्चिती पडताळणी लेखाधिकारी वेतन पडताळणी पथक चौकशी केली, असता वेतनश्चिती योग्य असल्याचे त्यावेळी नमूद केले होते.सन 2017 साली अस्थायी वैद्यकीय अधिकारी यांचे सेवेतील खंड क्षमापीत न करता अस्थायी कालावधीत रक्कम वैद्यकीय अधिकारी यांना प्रदान केल्याप्रकरणी लातूर येथील उपसंचालक स्तरावरून चौकशी करण्यात आली. त्यानुसार शासनास अहवाल सादर करण्यात आला. यात डॉ. बी.एम.शिंदे यांना सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने वेतननिश्चिती करण्यात आली आहे. रक्कम अदा करण्यात आली.त्यांना अस्थायी नियुक्ती कालावधीतील फ रकांची रक्कम देण्यात आलेली आहे.

माझी वर्ग एकची वेतननिश्चिती सन 2011 साली आहे. याबाबतची पडताळणी सुद्धा झालेली आहे. तरी तक्रारदाराकडून उपोषण व निवेदने देऊन माझी बदनामी करण्याचा डाव आखला जात असल्याचे डॉ. बालाजी शिंदे यांनी नमूद करताना माझा डॉ. मैकाले यांच्या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसल्याचे सांगितले.