मृत्यू रोखण्याचे आव्हान ठरतेय जड

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी यात कोरोनामुळे मृत्यू पावत जाणार्‍या रुग्णांची संख्या रोखणे प्रशासनासमोर आव्हान आहे. सरासरी पाच रुग्णांचा मृत्यू होतच आहे.सोमवारी सुद्धा पाच जणांचा मृत्यूची नोंद कोरोनाच्या संसर्गामुळे झाली आहे. यात पंचविस वर्षीय महिलेच्या मृत्यूचा समावेश आहे.

मागच्या चौवित तासांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवाल सोमवार दि. 24 रोजी प्राप्त झाला आहे. 545 नमूने तपासण्यात आला. 359 निगेटीव्ह आले आहेत. तर 118 नमून्यांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर 67 व अंटीजन चाचणीत 51 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 5 हजार 150 एवढी झाली, तर आज रोजी 113 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत 3 हजार 328 कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या 1 हजार 598 जणांवर उपचार सुरु असून 143 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——-
पाच जणांचा मृत्यू

नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि. 23 रोजी, नांदेड येथील शक्तीनगर भागात राहणार्‍या 25 वर्षीय महिलेचा दि. 23 रोजी, नांदेड शहरातील सहयोग नगर भागातील 65 वर्षीय पुरुषाचा दि. 23 रोजी, नांदेड शहरातील प्रगती नगर येथील 68 वर्षीय पुरुषाचा दि. 24 रोजी, तर नांदेड येथील शिवाजी नगर भागात राहणार्‍या 78 वर्षीय पुरुषाचा दि. 24 रोजी मृत्यू झाला. असे आतापर्यंत कोरोनामुळे जिल्हयातील 188 जण मरण पावले आहेत.