कार्यकारी अभियंत्याने सहा महिन्यात गुडघे टेकले

ताज्या बातम्या नांदेड

 

नांदेड,बातमी24:- रिक्त झालेल्या कार्यकारी अभियंता पदावर प्रभारी म्हणून सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या एका उपअभित्याने कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याच्या कारणावरून गुडघे टेकले आहेत. या उपअभियंत्याने निघून जाण्याची तयारी चालविली आहे.व्याप वरिष्ठ अधिकारी की पदाधिकारी यांचा असा प्रश्न निर्माण होत आहे.

नांदेड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जोशी हे सेवनिवृत्त झाल्यानंतर येथील रिक्त पदाचा पदभार देगलूर पंचायत समितीचे उपअभियंता असलेल्या आर.एस.बोरगळ यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

आर.एस.बारगळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लिहलेल्या पत्रात नमूद करण्यात आले,की माझे कुटूंब पुणे वास्तव्यास आहे.आई-वडील वयस्क असून त्यांच्या उपचाराकडे लक्ष धावे लागते.

देगलूर येथील उपअभियंता व नांदेड येथील कार्यकारी अभियंता असा दुहेरी ताण पडत आहे. याचा माझ्या आयुष्यावर व प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे.
त्यामुळे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात यावी,अशी मागणी बोरगळ यांनी पत्राद्वारे केली.