शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा सर्वोत्तम उपाय – सौ.प्रणिता देवरे चिखलीकर

ताज्या बातम्या नांदेड

नांदेडयोगाथॉनला नांदेडमध्ये उदंड प्रतिसाद, जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांची प्रमुख उपस्थिती
नांदेड : अलीकडच्या काळात मानवी जीवन अत्यंत व्यस्त आणि धक्कादुकीचे झाले आहे . त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधीने आपण ग्रस्त होत आहोत. परिणामी मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. मानवी आरोग्य अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक बळ मिळण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय असून प्रत्येक नागरिकांनी योगासनाकडे वळावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.
मोदी सरकारला नऊ वर्ष झाल्याबद्दल नांदेड जिल्ह्यात मोदी @9 अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज जागतिक योगा दिनाचे औचित्य साधत नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या पुढाकारातून योगा योगाथॉन आयोजित करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून योगाथॉनची सुरुवात झाली. वजीराबाद मार्गे योगाथॉन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. क्रांतीसूर्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला.
यावेळी बोलताना योगाथॉन आयोजिका सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर म्हणाल्या की, प्रत्येक माणूस हा अलीकडच्या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष कमी देतो आहे. दैनंदिन जीवनातील कामकाजाने व्यस्त असल्यामुळे अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास साधा वेळ मिळत नाही. भौतिक सुखाच्या मागे मोठ्या प्रमाणात धावणाऱ्या नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडत चालले आहे. परिणामी आपल्या कुटुंबावर त्याचे परिणाम होऊ लागले आहेत. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्ये आरोग्याला अनन्यसाधारणा असे महत्त्व असल्याने प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपले आरोग्य अधिक सुकर राहण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून योगाला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. जगातील कानाकोपऱ्यात योगाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आपणही जात, धर्म आणि राजकारण बाजूला ठेवून स्वतःच्या आरोग्यासाठी योगाकडे वळावे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, मनपा आयुक्त डोईफोडे, भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शितलताई भालके, चैतन्यबापू देशमुख,मिलिंद देशमुख, महेश खोमणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, नांदेड लोकसभा योगा प्रभारी दिलीप ठाकूर, अनिल बोरगावकर,माजी सभापती आनंदराव पा. ढाकणीकर, शंकरराव ढगे, श्रद्धाताई चव्हाण, नेरळकर आशिष, संदीप कराळे, दत्तात्रय काळे, सुरेश लंगडापुरे, रामजी शिवपनोर यांच्यासह यांच्यासह भाजपा ग्रामीण-शहर पदाधिकारी-कार्यकर्ते,अमरनाथ यात्री संघ,पतंजली योग सेवा संघ,विद्यार्थी- विद्यार्थिनी,तरुण, ज्येष्ठ बंधू-भगिनी यांच्यासह अनेक नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सुखबीरसिंग फौजी यांच्यातर्फे चहा-पाणी व अमरनाथ यात्री संघातर्फे बिस्किटे वाटप करण्यात आली.