नांदेड,बातमी24ः- मागच्या चार दिवसांमध्ये 63 रुग्णांची भर पडल्याने रविवार मात्र कोरेानाची साखळी तुटण्याची शक्यता आहे. आजच्या तारखेत एकही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी रविवार दिलासा देणारा असणार आहे.
मागच्या आठवडयात बुधवारपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. दहा पेक्षा जास्त रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. तर मागच्या तेरा दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यात शंभराहून अधिक रुग्ण वाढले आहेत. गुरुवारी 22 रुग्ण वाढले. शुक्रवारी दोन रुग्ण दगावले तर दहा रुग्ण वाढले होते. त्यानंतर शनिवारी तर कोरोनाने कहर केला. एकाच दिवशी 22 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
प्रयोग शाळेकडून अहवाल पाठविण्यात आला आहे. यामध्ये सर्वच्या सर्व अहवाल हे निगेटीव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या चार दिवसांपासून सुुरु असलेल्या रुग्णांची वाढ रविवार पुरती का होईना थांबली म्हणता येईल. आजपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 256 असून यातील 168 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. तर 75 रुग्ण उपचार घेत आहेत.