नांदेड, बातमी24ः- गुरुवारी कोरोनाचे पाच रुग्ण वाढले तर एकाचा मृत्यू झाला असताना शुक्रवारी 65 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे.
नांदेड शहरताील उमरी कॉलनी भागात राहणार्या एका 54 वर्षीय इसमाचा उपचारास प्रतिसाद न मिळू शकल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 25 रोजी सायंकाळी घडली होती. त्यापूर्वी जिल्ह्यातील पाच जणांचे स्वॅब हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. तर 19 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले.
शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गुलजार बागेतील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू कोरोनाच्या आजारामुळे झाला आहे. या मयताची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 331 पार गेली, असून कोरोनामुक्त रुग्ण हे 267 झाले आहेत.