आमदार पवार यांच्या वक्तव्याची काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर दखल; जिल्हा काँग्रेसकडून बेदखल

देश

नांदेड,बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या व्हायरल मोबाईल क्लिपची इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिकृत फे सबुक पेजवर दखल घेण्यात आली आहे. आमदार पवार यांच्या वक्तव्याकडे जिल्हा काँग्रेस कमिटीने साफ दुर्लक्ष केल्याची बाबसमोर येत आहे.

नायगाव तालुक्यातील नांवदी येथील मोहनलाल ठाकुर नामक कार्यकर्त्यांने गावाकडे कधी येणार अशी विचारणार केली, असता सरकारने बाहेर पडू नये, असे सांगितले असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांने मग पुन्हा कधी येऊ नका, असे म्हणताच राजेश पवार यांचा पारा चढला. भडव्या, मादरचोद,तुझ्या बापाचे अशा शब्दात कार्यकर्त्यांवर शाब्दीक हल्ला चढविताना धमकी वजा इशारा दिला. लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची भाषा असभ्यता दर्शविणारी ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

आमदार राजेश पवार यांच्याकडून झालेल्या शिवीगाळीची जिल्हाभरातून चर्चा होत आहे. या प्रकरणी भाजप पक्षांतर्गत ही राजेश पवार यांची तक्रार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून त्या व्हायरल क्लिपची दखल घेण्यात आली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिकृत फे सबुक पेजवर ही क्लिप लोड करण्यात आली, असून या क्लिपचे राजकीय भांडवल काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरून केले जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्या नांदेड जिल्ह्यात हा प्रकार घडला. तो नांदेड जिल्हा काँग्रेसचा मराठवाडयातील एकमेव गड मानला जातो. स्थानिक पातळीवर राजेश पवार यांच्या क्लिपचे समर्थन केले जाते की काय? सवाल उपस्थितीत होत आहे.

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असताना जिल्हा काँग्रेस कमिटीकडून मात्र याकडे क्लिपच्या संदर्भाने दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे, राजेश पवार यांनी काँग्रेस पक्षाकडून दोन वेळा विजयी झालेल्या वसंत चव्हाण यांचा पराभव केला. वसंत चव्हण हे अशोक चव्हाण यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. क्लिपसंदर्भात आवाज उठवून राजकीय लाभ मिळविण्याची संधी काँगे्रस पक्षाला जिल्हा पातळीवर असताना जिल्हा काँग्रेस पक्ष पदाधिकारी हे या प्रकरणी मुगगिळून गप्प आहेत.