नांदेड,बातमी24 :-
मंगळवारी आलेल्या अहवालात 108 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.तसेच 271 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने सुट्टी देण्यात आली.
आजरोजी 861 अहवालापैकी 734 अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांची संख्या आता 17 हजार 602 एवढी झाली असून यातील 14 हजार 903 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 132 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 50 बाधितांची प्रकृती अती गंभीर आहे.
या अहवालात चार जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवार 12 ऑक्टोंबर रोजी नाळेश्वर नांदेड येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर चेतापूर नांदेड येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर हडको नांदेड येथील 66 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 461 झाली आहे.