नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यासाठी शुक्रवार कर्दनकाळ ठरला असून सायंकाळनंतर कोरोनाच्या आकडेवारीच्या नांदेड जिल्ह्याला धक्के पे धक्का देण्याचे काम केले आहे. रात्री अकरा वाजता आलेल्या 29 अहवालात 4 नव्या रुग्णांचा भर पडला आहे.त्यामुळे दिवसभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक मृत्यू आणि 17 पॉझिटिव्ह अशी झाली आहे.
पाच वाजेपर्यंत अहवाल सर्व निगेटिव्ह होते,मात्र सायंकाळी आलेल्या अहवालात 7 अहवालात 4 पॉझिटिव्ह,साडे आठ वाजता 12 अहवालात 9 जण पॉझिटिव्ह आले तर रात्री अकरा वाजता 29 नमुन्यांची अहवालात 4 पॉझिटिव्ह आले.
चार जणांमध्ये लेबर कॉलनी येथील 34 वर्षीय पुरुष,इतवारा भागातील 64 वर्षीय महिला तर लोहा येथील पालम रोडवरील गॅस गोदाम येथील 55 वर्षीय महिला व 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 348 झाली आहे.
चौकट
सात वाजता 7 अहवाल आले यात 4 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शिवाजी नगर येथील 62,बोरबन भागतील 55 वर्षीय महिला,58 वर्षीय गोकुळ नगर,6 वर्षाची बालिका बिलाल नगर येथील आहेत.
साडे आठ वाजता 12 अहवालात 9 अहवाल पॉझिटिव्ह आले. नायगाव येथील 44 पुरुष,कंधार येथील 44 वर्षीय महिला, नांदेड नाथ नगर येथील 22 तरुणी, भगतसिंग रोड येथील 52 वर्षीय महिला, पिरबुऱ्हाण नगर येथील 20 ,19 महिला व 3 वर्षीय बालक तसेच उमर कॉलनी येथील 60 28 वर्षीय महिलाच समावेश आहे.