सात दिवसांमध्ये 17 मृत्यू; गंभीर रुग्णांच्या संख्येत चढउतार

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नव्याने लावण्यात आलेल्या कोरोनाच्या टाळेबंदीस उद्या आठ दिवस होणार आहे. मागच्या सात दिवसांच्या काळात दि. 16 गुरुवारचा अपवाद वगळता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही. ती वाढत गेली. ही संख्या वाढत असताना कोरोनामुळे होणारा मृत्यूचा आकडा ही वाढत गेला. गत सात दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17 झाली आहे. तर गंभीर आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसाकाठी चढ-उतार होत आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन ते चाळीस ने वाढ होती. परंतु शनिवार तब्बल 94 रुग्ण वाढल्याने मोठा धक्का बसला. यात प्रशासनाने तात्काळ तपासणी तात्काळ अहवाल ही प्रक्रिया सुरु केली आहे. ही समाधानाची बाब असून रुग्णांना तपासणी अहवालाच्या प्रतिक्षेत संशयित रुग्णास रेंगाळत पडण्याची आवश्यकता पडत नाही.
——-
गंभीर रुग्ण व मृत्यूची आकडेवारी

दिनाक—-गंभीर रुग्ण —-मृत्यू— एकूण मृत्यू
12 जुलै—–25——-03——–30

13 जुलै—–27——-05——–35

14 जुलै—–34——-01——–36

15 जुलै—–24——-03———39

16 जुलै—–22——-01———40

17 जुलै—–20——-03———43

18 जुलै—–27——-01———44
——-