नांदेड, बातमी24:- बुधवारी करण्यात आलेल्या एकूण तपासण्यांपैकी 1 हजार 79 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 599 हे नांदेड वाघाला मनपा हद्दीमधील आहेत,त्याचसोबत 854 जणांना रुग्णलयातुन सुट्टी देण्यात आली,तर 24 जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गाने ओढवला आहे.
मागच्या 24 तासांमध्ये 3 हजार 918 जणांची चाचणी करण्यात आली.यात 2 हजार 764 निगेटिव्ह आले,तर 1 हजार 79 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे रुग्णसंख्या 43 हजार 35 एवढी झाली आहे.854 रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 39 हजार 447 एवढ्यावर पोहचली. तर आज रोजी 24 जणांचा मृत्यू झाला,असून 10 महिला व 14 पुरुषाचा समावेश आहे.मृत्यूमध्ये 40च्या पुढील इसमांची नोंद आहे.
सध्या 10 हजार 157 जणांवर उपचार सुरू आहेत,त्यातील 172 जणांची प्रकृती गंभीर आहे.