नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सहा जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने रविवार दि. 20 रोजी दाखविली आहे. यात 29 वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे.तर चाचण्या कमी करण्यात आल्याने रुग्णसंख्या 240 झाली आहे.
रविवार दि. 20 रोजी 996 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 687 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 240 जण कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणीत 108 तर अंटीजनमध्ये 132 जणांच समावेश आहे. एकूण रुग्णसंख्या 13 हजार 556 एवढी झाली आहे. तर आजरोजी 324 जण कोरेानामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 9 हजार 378 एवढी झाली आहे. सध्या 3 हजार 755 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील 42 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——-
सहा जणांचा मृत्यू
नांदेड येथील सावित्रीबाई फु ले नगर येथील 29 वर्षीय पुरुषाचा दि. 18 रोजी मृत्यू झाला. कंधार तालुक्यातील पेठवडज येथील 57 पुरुषाचा दि. 19 रोजी, नांदेड येथील नमस्कार चौक येथील 90 वर्षीय पुरुषाचा दि. 19, नांदेड येथील जोशी गल्ली येथील 67 वर्षीय पुरुषाचा दि. 18 रोजी, देगलूर नाका येथील 64 वर्षीय पुरुषाचा दि. 19 रोजी तर कंधार तालुक्यातील औराळा येथील 40 वर्षीय पुरुषाचा दि. 20 पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 356 वर पोहचली आहे.