शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रूपयांची मदत तात्काळ करावी-सुरेश गायकवाड

नांदेड

नांदेड,बातमी24 –
देगलूर, बिलोली तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येथील शेतकर्‍यांचे, घरांचे नुकसान झाले असून काही भागातील नवीन झालेले रस्ते व पूल वाहून गेले असून आज सर्व नुकसानग्रस्त भागांची माहिती घेऊन पाहणी करून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना आज रोजी देगलूर बिलोली बीआरएसचे प्रभारी सुरेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिष्ट मंडळाच्या वतीने निवेदन देऊन ओला दुष्काळ जाहीर करून सर्वांना एकरी 50 हजाराची मदत करावी, अशी मागणी केली.
तसेच ज्या ठिकाणी रस्ते पूल वाहून गेले आहेत तेथील निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित गुतेदारांवर गुन्हे दाखल करून सर्वांना सरसकट मदत करावी. जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढारी व प्रतिनिधींनी गावोगावी जाऊन फोटो शेषन करण्यापेक्षा एकत्र येऊन पावसाळी अधिवेशनात जिल्ह्याचा मुद्दा लावून धरून तो कसा मंजूर करून घेता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास सर्व नुकसानग्रस्तांना एकत्र करून बीआरएस पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी कैलासभाऊ येसगे, रमेश घुळेकर, श्याम वदेवार, संदीप भुताळे, इंगळे, राहुल गायकवाड व देगलूर येथील बीआरएसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.