सीईओ ठाकूर यांच्या कार्याला पालकमंत्र्यांचे ए-ग्रेड सर्टिफिकेट

नांदेड

 

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषदमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्व.शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळ्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या कार्याची प्रशंसा उत्कृष्ट अधिकारी असे ए-ग्रेडचे सर्टिफिकेट देऊ केले. सीईओच्या प्रशासकीय कामकाजात पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य करत लोकहिताचे कार्य करून घ्यावे असे चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. अलिकडच्या दहा वर्षात जाहीरपणे एखाद्या सीईओ यांच्या कार्याची प्रशंसा तेही अशोक चव्हाण यांनी करण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी, अशी जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा होती.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने 11 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 17 शेतकऱ्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यासाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावनगावकर यांचे परिश्रम यासाठी विशेष उल्लेखनीय ठरले. भव्य आणि नेत्रदीपक सोहळा शेतकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.

 

जिल्हा परिषदेतील शेतकरीनिष्ठ पुरस्कार सोहळ्यात बोलताना अशोक चव्हाण यांनी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करत यांच्या काळात प्रशासन गतीमान झाल्याचे सांगत प्रत्येक विभागवार त्यांचे लक्ष असते.शासनाच्या योजना ग्रामीण भागातील नागरिकपर्यंत घेऊन जाण्याचा मानस असतो असे नामदार चव्हाण यांनी सांगितले.

चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी येथील जिल्हा परिषद पदाधिकारी-सदस्य यांनी उभे राहून सीईओ वर्षा ठाकूर यांच्या प्रशासन सहकार्य ठेवण्याची भूमिका राहुधां असा सल्ला सुद्धा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पदाधिकारी व सदस्यांना दिला. कालचा पुरस्कार सोहळा शेतकऱ्यांसोबतच्या सीईओ वर्षा ठाकूर यांच्या प्रशासकीय कार्याचा गौरव करणाराही ठरला.


——–
आठरा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी प्रशासनवर पूर्णतः पक्कड असून हुकूम किंवा आदेश देऊन त्या घर आणि कार्यालय इतक्यावरच थांबत नाहीत.रोजचे स्वतःचे दौरे त्यात कैकवेला किनवटच्या अति दुर्गम भागापर्यंत त्या रात्रीवेळी सुद्धा जाऊन शासनाचा उपक्रम त्या सांगत असतात.इतकेच नव्हे तर प्रत्येक विभागवार त्यांचे सूक्ष्म लक्ष, जनतेच्या प्रश्नांची जाण आणि अभ्यागतचे प्रश्न जाग्यावर सोडविण्याची तत्परता ही त्यांच्या कार्याचे जाणतेपणा दर्शवून जाते.त्यामुळे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्षा ठाकूर यांच्या कार्याची जाहीरपणे पाठराखण आणि प्रशंसा करत ए-ग्रेड सर्टिफिकेट देऊ केल्याचे बोलले जात आहे.