रुग्ण संख्येचा आजही नवा उचांक; कोरोनाचे द्विशतक

नांदेड

नांदेड, बातमी24ः कोेरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. ही संख्या नियंत्रणाबाहेर जात असल्याने दिवसाकाठी रुग्ण संख्या वाढत आहे. सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या 203 झाली आहे.

सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी एक हजार 106 जणांचा स्वॅब तपासण्यात आला. यामध्ये 854 जणांचा स्वॅब निगेटीव्ह आला तर 203 रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 124 तर अंटीजन किटद्वारे केलेल्या तपासणीमध्ये 79 पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजार 369 इतकी झाली आहे. तर 66 रुग्ण हे बरे झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा आकडा पार केला आहे.

मागच्या चौविस तासांमध्ये देगलूर येथील 72 वर्षीय महिला दि. 2 रोजी, चौफ ाळा येथील 65 वर्षीय पुरुष दि. 2 रोजी, नाटकर गल्ली येथील 56 वर्षीय पुरुष दि. 3 रोजी, तर कंधार येथील फु ले नगर येथील दि. 3 रोजी मरण पावले.हे सर्व रुग्ण कोरोनाच्या संसर्गामुळे दगावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 94 झाली आहे.
——–
तालुकानिहाय आरटी-पीसीआर अहवाल

नांदेड शहर-33, अर्धापुर-1, भोकर-2, बिलोली-8, देगलूर-19, धर्माबाद-5, हदगाव-26, कंधार-1, नांदेड ग्रामीण-2, किनवट-5, मुखेड-2, नायगाव-6, उमरी-11, परभणी-2, यवतमाळ-1 असे 124
——
अंटीजन किटद्वारे आलेला रिपोर्ट
अर्धापुर-2, किनवट-9, नायगाव-23, बिलोली-9, मुखेड-11 तसेच नांदेड शहर 25 होय असे एकूण 79 आहेत.