रुग्ण संख्येचा पुन्हा नवा उचांक;रुग्णसंख्या जवळपास चारशे

नांदेड
नांदेड,बातमी24:– नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने  पुन्हा मुंडके वर काढले असून आजची कोरोनाच्या रुग्णांची संख्या 380 एवढी झाकी आहे. तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे.
बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी 1 हजार 614 अहवाल तपासण्यात आले. यात 1 हजार 195 अहवाल निगेटिव्ह तर 380 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 123 तर अटीजनमध्ये 257 जणांचा पॉझिटिव्ह म्हणून समावे श आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 407 जण पॉझिटिव्ह आले,यात 4 हजार 777 रुग्ण बरे झाले,तर  2 हजार 337 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 249 जणांची प्रकृती गंभीर आहे.
आज आलेल्या रुग्णांमध्ये 178 रुग्ण हे एकट्या नांदेड शहरातील आहेत,त्यानंतर अर्धापुर-19,भोकर-15, देगलूर-17, मुखेड-20, हदगाव-16, नांदेड ग्रामीण-25,बिलोली-15, माहूर-12 असे रुग्ण आहेत,उर्वरित तालुक्यात रुग्णसंख्या एकेरी आहे.
——-
सहा जणांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात 6 जणांचा मृत्यू झाला.
यात हिंगोली गेट येथील  64 वर्षीय पुरुषाचा दि.31 रोजी, तरोडा येथील 68 वर्षीय पुरुषाचा दि.31 रोजी, मगनपुरा येथील 80 वर्षीय पुरुषाचा दि.1 रोजी,पोलिस कॉलोनी येथील 53 वर्षीय पुरुषाचा दि.1 रोजी, तरोडा येथील 67 वर्षीय महिलेचा    दि.2 रोजी, तर बिलोली तालुक्यातील कासरली येथील 60 वर्षीय पुरुषांचा दि.2 रोजी मृत्यू झाला,त्यामुळे जिल्ह्यातील मृत आकडा 243 झाला आहे.