नांदेड, बातमी24ः शनिवारी प्राप्त झालेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या पॉझिटीव्ह संख्येने आतापर्यंतचे संगळे विक्रम मोडीत काढले आहेत. तब्बल 269 नवे रुग्ण सापडले आहेत. तीन जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दिली आहे.तर 178 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजरोजी 1 हजार 353 जणांचे नमूने मागच्या चौविस तासांमध्ये तपासले गेले आहेत. यात 1 हजार 96 जणांचा अहवाल निगेटीव्ह, 269 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 90 व अंटीजनमध्ये 179 अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत 6 हजार 124 जण पॉझिटीव्ह आले. यातील 4 हजार 240 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या 1 हजार 627 जणांवर उपचार सुरु असले, तरी यातील 179 जणांची प्रकृती नाजूक आहे. कोरोनाने जिल्ह्यातील 214 जणांचा बळी घेतला आहे. यात आजच्या तीन मृतांचा सुद्धा समावेश आहे.
——
तालुकानिहाय आलेले पॉझिटीव्ह रुग्ण
नांदेड शहर- 95, भोकर-2, बिलोली-18, देगलूर-10, किनवट-5,कंधार-10, उमरी-15, नायगाव-11, नांदेड ग्रामीण-7, मुदखेड-4, हदगाव-3, लोहा-18, माहुर-1, मुखेड-25, धर्माबाद-23, याचसोबत 11 रुग्ण हे पुणे, निझामाबाद, परभणी,हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.