पदाधिकारी निगेटिव्ह तर अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदमध्ये व्यापक स्वरूपात अटीजन चाचणी अभियान राबविण्यात आले.विशेष:म्हणजे तपासणी केलेले जिल्हा परिषद अध्यक्षासह सर्व पदाधिकारी निगेटिव्ह आले,तर अधिकारी-कर्मचारी निगेटिव्ह आले आहेत.जवळपास 30 जण पॉझिटिव्ह आल्याने पुढील काही दिवस जिल्हा परिषदेला टाळे लागणार आहे.

मागच्या महिन्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत जिल्हा परिषद इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी व सर्व पदाधिकाऱ्यांची अटीजन चाचणी करण्याचा निर्णय झाला होता,त्यानुसार बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी चाचणी अभियान राबविण्यात आले.

त्यानुसार जवळपास साडे तिनशेहुन अधिक जणांची चाचणी करण्यात आली,यात 25 ते 30 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. एकट्या ग्रामीण विकास यंत्रणेतील 11 जण पॉझिटिव्ह आले आहेत. इतर विभागातील सुद्धा दोन-तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
——-
सोमवारी जिल्हा परिषद उघडणार

जिल्हा परिषदमध्ये घेण्यात आलेल्या अटीजन चाचणीत 25 ते 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली.त्यामुळे सोमवरपर्यंत जिल्हा परिषद बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.