नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी माहुर प्रभारी गट विकास अधिकारी देताना स्वतःच्या मर्जीतील माणून बसविण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी हाणून पाडला आहे. त्यानिर्णयावरून प्रकरण शकण्याची चिन्हे दिसताच कुलकर्णी यांनी निर्णय बदलून दिला. प्रकरण समोर आले, म्हणून समजले. मागच्या चार महिन्यात अशी अनेक प्रकरणे किंवा निर्णय उघडकीस आल्यास कुलकर्णी यांच्या अडचणी वाढू शकतात.
जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या पंचायत समितीमध्ये बोटावर मोजण्याइतके सुद्धा पूर्णवेळ गट विकास अधिकारी नाहीत. प्रभारी अधिकार्यांवर कारभार चालविला जात आहे. खुद नांदेड जिल्हा परिषदेलाच पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी न मिळणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने खेदाची बाब आहे. त्यामुळे डॉ. शरद कुलकर्णी यांच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस कधी चांदी तर कधी सोन्याचा ठरत आहे.
माहुरचे प्रभारी गटविकास अधिकारी विशालसिंग चव्हाण हे वैद्यकीय कारणांवरून रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी प्रभारी पदभार देताना त्याच पंचायत समितीचा ए बिडिओ किंवा त्या तालुक्या भोवतीच्या गटविकास अधिकार्यास पदभार देणे संयक्तिक ठरते. परंतु डॉ. शरद कुलकर्णी यांनी पदाचा अतिरक्त वापर करताना हदगाव येथील प्रभारीच गट विकास अधिकारी असलेल्या देशमुख नामक अधिकार्यास माहुर गट विकास अधिकारी पदाचा पदभार दिला.
तसे आदेश काढल्याची माहिती मिळताच माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी संतापले. हदगाव ते माहुर अंतर मोठे असताना हदगाव येथील गट विकास अधिकारी काय काम करू शकणार, त्या जागी ए बिडिओकडे पदभार सोपविला जायला हवा होता, अशी मागणी केली.
हे प्रकरण माध्यमांत गेल्यानंतर कुलकर्णी यांना चांगलाच चपराक बसला. सोमवारी सुधारीत आदेश काढत किनवट येथील गट विकास अधिकारी धनवे यांच्याकडे प्रभारी पदभार दिला जात असल्याचे आदेश काढले. या प्रकारामुळे कुलकर्णी यांना तोंडावर आपल्यासारखे झाले आहे. चार महिन्यांच्या काळात कुलकर्णी यांनी असे किती संचिका एकहाती हाताळल्या असतील, याचीच चर्चा सुरु झाली आहे.