नितीन राऊत यांच्या संदर्भाने अशोक चव्हाण यांचे वक्तव्य पक्षातर्गत विसंवाद घडविणारे:-प्रवीण दरेकर

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- वीज माफीचा संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या संदर्भाने केलेले वक्तव्य म्हणजे पक्षातर्गत विसंवाद दर्शविणारी बाब समोर आली आहे,त्यामुळे सरकार व या तिन्ही पक्षात एक वाक्यता नसल्याचे दिसून येते,अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली,ते नांदेड पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप मित्र पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ दरेकर हे नांदेड येथे आले होते, यावेळी बोलताना ते म्हणाले,की ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत विजमाफी देण्याची घोषणा केली होती,मात्र अद्यापपर्यंत माफीची पूर्तता होऊ शकली नव्हती. या संदर्भाने अशोक चव्हाण यांनी त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यास तोंडघशी पडणारे वक्तव्य केल्याचे बघायला मिळाले,असून राऊत यांनी पक्ष व सरकारला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा,असे विधान केले,त्यावर नितीन राऊत व बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊन निर्णय घेतल्याचे सांगत अशोक चव्हाण यांचे विधान खोडण्याचा प्रयत्न केला,यावरून काँग्रेस अंतर्गत एक वाक्यता आणि विसंवाद समोर आला असल्याचे सांगत दरेकर म्हणाले,की या तिन्ही पक्षात समनव्य नसल्याची बाब समोर येते.

या सरकारचा वर्षभरातील कार्यकाळ निष्क्रिय राहिला आहे.विविध योजना,मराठा आरक्षण,शैक्षणिक धोरण,गत काळातील बंद पडलेले प्रकल्प पाहता,हे सरकार वर्षेभरात अपयशी झाल्याचे लपविण्यासाठी केंद्राकडे बोट करणे इतकेच या सरकारचे काम राहिल्याचे ते दरेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला खासदर प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोलीकर, आमदार राजेश पवार, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले,संतुक हंबर्डे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.