अधिकार्‍यांनी मारले मटन मार्केटेला सील

नांदेड

नांदेड, बातमीः- सगळीकडे लॉकडाऊनचे कोटेकोरेपणे पालन केले जात आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अगदी किराणा दुकाने सुद्धा बंद असताना हदगाव येथील मटन मार्केट अनाधिकृतपणे चालू ठेवल्याच्या प्रकरणावरून नगरपालिकेच्या वतीने दुकानांना सील मारण्यात आले.ही कारवाई शुक्रवार दि. 17 जुलेै रोजी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वाढती कोरोनाची रुग्णांची साखळी तोडण्यासाठी दि. 12 जानेवारीपासून संचारबंदी सुरु केली आहे. या नियमांचे सगळीकडे पालन केले जात असतान हदगाव येथील मटन मार्केट गपचूपपणे चालविले जात होते. या संदर्भात भाजपचे युवा कार्यकर्ते माधव देवसरकर यांनी सदरची बाब नगर पालिकेच्या निर्देशनास आणून दिली. यासंबंधी माधव देवसरकर यांनी निवेदन ही दिले होते. अनाधिकृतपणे मटन विक्रेत्यांवर कारवाई अन्यथा सीओ दालनात मटन विकण्याचा इशारा देण्यात आला होता.

यावरून नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी आठवडी बाजारात जाऊन धाडी मारली. या वेेळी चिकन- मटनची दुकाने खुलेआमपणे सुरु होती. या प्रकरणी दंड ठोठावत अधिकारी-कर्मचार्‍यांनी सील मारले. या कारवाईमुळे मटन विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.