संजय बियाणी हत्या प्रकरणी भाजपची जोरदार निदर्शने; खासदार चिखलीकर यांचा पोलिसांवर हल्लाबोल

नांदेड

नांदेड, बातमी24:- नांदेड येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या घटनेस पंधरा दिवस उलटले, तरी पोलीस या प्रकरणाचा अद्याप तपास लावू शकले नाहीत.या निषेधार्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार दि.20 रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पोलीस प्रशासनाचा खरपूस समाचार घेत त्यांचे वाभाडे काढले.

यावेळी बोलताना खासदार चिखलीकर म्हणाले,की पाच एप्रिल रोजी संजय बियाणी यांच्या राहत्या घरासमोर भरदिवसा यांची हत्या झाली. तेव्हापासून नागरिक व व्यापारी भयभीत असून पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना अपयश आले आहे. केवळ गुटखा व मटका हप्ते वसूल करण्याचे एकमेव काम पोलिसांना उरले असून त्यात पोलिसांना रस आहे. त्याचसोबत पत्याचे क्लब व वाळू माफिया राज चालविण्याचे काम पोलीस करत असल्याने गुन्हेगारी शहरात वाढल्याचा आरोप करत पोलिसच खडणीखोरांचे मध्यस्थी करत असल्याची माहिती माझ्याकडे आहे,असा गंभीर आरोप त्यांनी केला.

यापूर्वी दिघोरे सारखे पोलीस अधिकारी जेलची हवा खात आहे.यावरून पोलीस काय करू शकतील आणि काय करत असतील याचा अंदाज येतो,नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे मंत्रीमंडळात वजन असे दाखविण्याचा प्रयत्न ते सतत करत असता.मात्र ते या प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप खा.चिखलीकर यांनी केला.पोलिसांवर सामान्य नागरिकांचा विश्वास राहिला नसल्याने केंद्रीय यंत्राने मार्फत तपास करण्याची मागणी केल्याचे सांगितले. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर,भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर,गंगाभीषण कांकर,मुन्ना बजाज,बालाजी पाटील मारतलेकर,श्रीहरी देशमुख,डॉ.मनिष देशपांडे,गाडीवान यांची भाषणे झाली,तर प्रास्ताविक प्रवीण साले यांनी तर सूत्रसंचालन दिलीप ठाकूर यांनी केले.या यावेळी शेकडोंचा जनसमुदाय या निदर्शनात सहभागी झाला होता.