नांदेड,बातमी:-नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या बदलीची चर्चा मागील सहा महिन्यांपासून सुरू होती.आज शुक्रवार दि.21 जुलै रोजी लातूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले,तर नांदेड सीईओ म्हणून मीनल करनवाल या नांदेडच्या नव्या सीईओ असणार आहेत.
सीईओ वर्षा ठाकूर-घुगे या सन 28 सप्टेंबर 2020 साली नांदेड जिल्हा परिषस सीईओ म्हणून आल्या होत्या.अनेक योजना व उपक्रम त्यांनी सुरू केले.जिल्हा परिषदेला नवलौकीक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली.मागील काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा जिल्हाभर सुरू होती,तेही लातूर जिल्हाधिकारी म्हणून नाव चर्चेत होते.आज त्यांच्या बदलीचे आदेश शासनाने निर्गमित केले.तर मीनल करनवाल ह्या नंदुरबार येथे आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिखाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.