सीईओ वर्षा ठाकूर यांनी पाडला कर्मचाऱ्यांसाठीउत्कर्ष पायंडा :- पूजरवाड; सार्वत्रिक बदल्यांवर कर्मचारी वर्ग खूष

नांदेड

नांदेड,बातमी24:नांदेड जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4 वर्ग संवर्गाच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियमांना प्राधान्य देत सर्वांना समान न्याय देत चोखपणे बदल्यांची प्रक्रिया पार पडली आहे,त्यामुळे त्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आयकॉन ठरल्या असून. त्यांच्या कार्यावर कर्मचारी वर्ग खूष असल्याची भावना कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी व्यक्त केली.

नांदेड जिल्हा परिषद आस्थापना मोठी असून जवळपास वीस हजार कर्मचारी वर्ग आहे.प्रशासकीय, विनंती व आपसी अशा सर्व विभगाच्या बदल्यांना दि.२०मे पासून सुरवात झाली होती. या बदल्यांची प्रक्रिया तबबल सहा दिवस चालली. मागील वर्षी झालेल्या काही चुका यावर्षी शंभर टक्के विशेषतःपूर्णपणे क्षमतेने निकाली काढण्याचा मानस सीईओ वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केला होता.यासाठी बदल्यांच्या दरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून राजकीय हस्तक्षेप होणार नाही,याची विशेष खबरदारी घेण्यात आली होती. यासाठी वर्षा ठाकूर यांनी धाडस दाखवीत तसे पत्र काढून राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या कर्मचऱ्यावर शिस्तभंग कार्यवाही करण्याचा इशारा यांनी दिला होता.परीणामी या आर्थिक वर्षातील सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया ही पूर्णपणे राजकीय हस्तक्षेपाविना पार पडली.हे विशेष म्हणावे लागेल.

सीईओ वर्षा ठाकूर यांनी बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया स्वतःच्या हातात घेतली. मागच्या वेळी काही अधिकाऱ्यांकडून ज्या काही चुका कळत किंवा नकळत झाल्या, याबद्दल फारस खोलात न जाता,बदली पात्र कर्मचाऱ्यांना बदलीने जावेच लागेल आहे. सर्व कर्मचाऱ्यांना समान तराजू लावला. हा जवळचा तो लांबला असे अंतर न ठेवता बदली पात्र असेल तर तो बदलीने जाणार हे सूत्र आखून ठेवले. एकावर न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय ही चौकट त्यांनी यावेळी मोडीत काढली. या सगळ्यांचा परिणाम पाहता, कुणावर ही अन्याय झाला ना होऊ दिला नाही.त्यामुळे या वर्षीच्या बदल्या हया चोखपणे पार पडल्या.

बदल्यांची प्रक्रिया नियमाला धरून यशस्वीपणे पार पडल्यामुळे तक्रारी करण्यास फारसा वाव कर्मचाऱ्यांना राहिला नाही.शिवाय ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यात,आहेत,अशा कर्मचाऱ्यांना सेवेवर वेळेत रुजू होणे भाग पडले असून बदली झालेले कर्मचारी बहुतांशी आपल्या ठिकाणी रुजू सुद्धा झाले आहेत.

सीईओ वर्षा ठाकूर यांनी नियमात राहून बदल्या केल्याबद्दल कर्मचारी वर्गात त्यांचे विशेष कौतूक होत आहे.अशा प्रकारच्या बदल्या पहिल्यादा पार पडल्याची भावना कर्मचारी व त्यांच्या संघटना बोलून दाखवित आहेत.

कर्मचारी संघटनेचे नेते बाबुराव पूजरवाड म्हणाले,की मी यसंघटनेचा राज्याचा नेता असून यावेळी सर्व कर्मचार्यांना बदल्यात समान न्याय दिला आहे,त्यामुळे आम्ही सर्व संघटना व कर्मचारी आनंदी असून सीईओ यांचा याबद्दल जाहीर सत्कार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.