जिल्हाधिकरी डॉ.इटनकर केली शेतात पेरणी;टिपिकल शेतकरी लूक

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- आपल्या ध्येय धोरणावर निश्चित राहून लोक सेवेत सतत कार्यमग्न राहणारे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोनाचे संकट कमी होताच डॉ.इटनकर यांनी खरिपाकडे मोर्चा वळविला,त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी आणि शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी डॉ.इटनकर हे शेतीवर पोहचले, तेही चक्क अगदी शेतकरी वेशभूष करून होय.यावेळी त्यांनी ट्रॅक्टरद्वारे शेतीमधील कामे करून शेतकरी पुत्राचे मनोबल उंचावले.

कोरोनाचे महाभयंकर संकट संपत आले आहे,या काळात दिवसरात्र एक करून डॉ.इटनकर यांनी सर्व आघाड्यावर मात केली.मात्र या संदर्भाने कुठेही गाजावाजा होऊ दिला नाही.

कोरोनाच्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना खरिपात त्रास होऊ नये,यासाठी डॉ.इटनकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना ताकीद दिली.त्यामुळे जिह्यात कुठे ही बियाणे व खतांची साठेबाजी झाली नाही.

डॉ.इटनकर यांनी मधल्या काळात बांधावर जाऊन जिल्ह्यातील शेतकरी संवाद साधला. तेव्हा तुप्पा येथील शेतकरी एकनाथ गणपतराव कदम यांनी डॉ.इटनकर यांनी शेतीवर येण्याचे आमंत्रण दिल होत.मात्र मधल्या काळात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.गत तीन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. त्यामुळे शेतकरी एकनाथ कदम यांनी डॉ.इटनकर यांना शेतावर भेट देणार होते, अशी आठवण करून दिली.

एकनाथ कदम यांच्या निमंत्रण मान राखत डॉक्टर इटनकर यांनी सकाळी साडे आठ वाजता शेतावर दाखल झाले.यावेळी त्यांनी शेतावर जाऊन ट्रॅक्टर चालविला. शेतशिवार पाहणी करून शेतावरील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तासभर शेतावर घालवीत शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची शेतकरी वेशभूषा व प्रत्यक्ष शेतावर जाऊन काम करण्याची पद्धती पाहून भोवतालचे शेतकरी भारावरून गेले.