कोरोनाचा संसर्ग फ ोफ ावला; नवी उचांकी संख्या

नांदेड

नांदेड, बातमी24; मागच्या सहा महिन्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारी सगळे उचांक मोडीत काढणारी ठरली. तब्बल 301 नवे कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

रविवार दि. 30 रोजी 1 हजार 352 नमूने तपासण्यात आले. यात 964 नमूने निगेटीव्ह आले तर 301 नमूने पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 95 तर अंटीजन चाचणीत 206 जण पॉझिटीव्ह आले. तर 129 जणांची कोरोनाच्या संसर्गातून मुक्ती झाल्याने आतापर्यंत 4 हजार 369 जण हे कोरोनातून बरे झाले आहेत. आजघडिला 1 हजार 792 जणांवर उपचार सुरु असून गंभीर रुग्ण संख्या 176 झाली आहे.
———
तालुकानिहाय रुग्ण संख्या
नांदेड शहर-142, अर्धापुर-5, बिलोली-32, देगलूर-1, किनवट-17, नायगाव-11, उमरी-3, हिंगोली-2, नांदेड ग्रामीण-17, मुदखेड-9,हदगाव-11, लोहा-29, कंधार-4, मुखेड-10, धर्माबाद-5 असे 301 नवे रुग्ण आहेत.
——–
सात जणांचा मृत्यू
सिडको भागातील 57 वर्षीय पुरुषाचा दि. 29, मुखेड तालुक्यातील बार्‍हाळी येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि. 29, नांदेड शहरातील खुदबई नगर येथील 55 वर्षीय महिलेचा दि. 29 रोजी, नांदेड शहरातील लाभ नगर येथील 51 वर्षीय पुुरुषाचा दि. 30 रोजी तसेच वजिराबाद भागातील 60 वर्षीय महिलेचा दि.30 रोजी असे पाच जण दगावले आहेत. त्यामुळे जिल्हयातील एकूण मृत्यूची संख्या 219 झाली आहे.