नांदेड, बातमी24ः-कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेत दिवसेंदिवस भर घालणारी ठरत आहे. बुधवारी सकाळी काही स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नव्याने नऊ वाढले आहेत. तर एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 493 इतकी झाली आहे.
प्रयोग शाळेकडून बुधवार दि. 8 जुलै रोजी 106 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 87 अहवाल निगेटीव्ह, 8 अनिर्णीत, 2 अहवाल नाकारण्यात आले, तर 9 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेले सर्वच्या सर्व रुग्ण हे पुरुष आहे. विशेष बहुतांशी रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 493 झाली आहे. तर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 335 आहे.
——-
65 वर्षीय महिलेचा मृत्यू
कंधार तालुक्यातील उमरज जवळील सोनमंतलतांडा येथे एका 65 वर्षी महिलेचा कोरोनाचा अहवाल दि. 30 जून रोजी पॉझिटीव्ह आला होता. या महिलेचा दि. 8 जुलै रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 23 झाली आहे. तर मंगळवारी दोन रुग्ण मरण पावले होते.
——-
कोरोना तपशीलवार
पत्ता————–स्त्री/पुरुष———-वय
1)काटकळंबा(कंधार)–पुरुष————24
2)सिडको(नांदेड)—–पुरुष————36
3)सावित्रीबाई फु ले नगर(नांदेड)-पुरुष——38
4)मुखेड————-पुरुष———-34
5) देगलूर————पुरुष———-46
6)परभणी————पुरुष———–70
7)बिलोली———-पुरुष————32
8)गोकुंदा(किनवट)—-पुरुष————18
9)गोकुंदा(किनवट)—-पुरुष————20