नांदेड शहरातील कोरेानाबाधित रुग्णांचा मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेड शहरातील एका वयस्क कोरोनाबाधित रुग्णाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 28 झाली आहे.

शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वजिराबाद भागातील 64 वर्षीय पुरुषाचा अहवाल शनिवार दि. 11 जुलै रोजी सकाळी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा दुपारी चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. तर दिवसभराच्या काळात 11 जण कोरोना पॉझिटीव्ह आले होते. तर 9 रोजी मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती दि. 11 रोजी कळविली.
——-
सोळा रुग्णांची प्रकृती गंभीर
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसोबत प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयातील 16 रुग्णांची प्रकृती गंभीर असून यामध्ये 9 महिला व सात पुरुषांचा समावेश आहे.