दोन रुग्णांचा मृत्यू; नव्या 66 रुग्णांचा वाढ
नांदेड, बातमी24- नांदेड जिल्ह्यात कोरेानाच्या रुग्णांची संख्या कमी-अधिक वाढत असून शनिवारी तब्बल 94 रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी मात्र रुग्णसंख्या 30 ने कमी होऊन 66 झाली आहे. आतापर्यं जिल्ह्यात झालेल्या रुग्णांची संख्या 936 इतकी झाली आहे. तसेच नांदेड शहरातील देशमुख कॉलनीमध्ये राहणार्या 65 वर्षीय महिलेचा व परभणी जिल्ह्यातील वसमत येथील 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. एकूण मयताची संख्या 46 पोहचली आहे
नांदेड जिल्ह्यात 468 नमूने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 402 नमूने निगेटीव्ह आले. तर 66 नमूने पॉझिटीव्ह आहे. विशेष म्हणजे,आरटीपीसीआर तपासणीव्दारे 47 व अॅटीजेन्स किटव्दारे 19 असे एकूण 66 पॉझिटीव्ह संख्या आहे. याचसोबत आनंदाची बातमी म्हणजे, रविवारी विविध केंअर सेंंटर येथे उपचार घेणार्या 24 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दहा दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 500 झाली आहे. उपचार घेणारे रुग्ण हे 389 असून आतापर्यंत 46 जणांना मृत्यूने कंवटाळे आहेत. यात 39 मृत्यू नांदेड जिल्ह्यातील व 7 मृत्यू हे इतर जिल्हयातील नोंदविले गेले आहेत.
_____
सूचनाः नव्याने आलेल्या 66 रुग्णांची माहिती थोडयाच वेळात विस्तृतपणे
lockdown vadhnyache confirmation samjave ya news la 🙂