कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट;मात्र मृत्यूच्या आकड्यात वाढ

नांदेड

 

नांदेड, बातमी24: नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत गुरुवार दि.13 आगस्ट रोजी घट झाली,असून 82 कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे कोरोनाच्या रुग्णाची संख्या 3 हजार 699 इतकी झाली आहे. तर प्रशासनाने पाच जणांच्या मृत्यूची नोंद नोंदविली आहे.

मागच्या 24 तासांमध्ये 629 नमुने तपासण्यात आले.यात 520 अहवाल निगेटिव्ह आले, तर 82 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.तर 71 बाधित रुग्णांची कोरोनातुन सुटका झाली.आतापर्यंत 2 हजार 127 जण कोरोनामुक्त झाले.

प्रशासनाकडून पाच जणांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली.यात नाईक नगर येथील 78 वर्षीय पुरुषाचा 12 रोजी, बळीरामपूर येथील 30 वर्षीय महिलेचा दि.12 रोजी, धनेगाव येथील 49 वर्षीय महिलेचा दि.12 रोजी,नायगाव येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि. 13 रोजी,तसेच दिलीपसिंग कॉलनी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 134 झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संख्या जिल्ह्यात 1 हजार 499 रुग्ण उपचार घेत असून त्यातील 142 जण गंभीर आहेत.