पंचायत राज समितीची विभागवार कानउघडणी;पाणी पुरवठा,आरोग्य,महिला बाल कल्याण निशाणावर

नांदेड

नांदेड,बातमी24:-जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीने सन 2016-17 या वर्षातील लेखा पुनर्विलोकनया अहवालातील त्रुटीवर बोट ठेवत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.त्रुटींची पूर्तता वेळेत करून अहवाल सादर करण्याची ताकीद समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिली. यावेळी सीईओ वर्षा ठाकूर यांनी एकहाती समितीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.मात्र समिती सदस्यांनी विभागप्रमुखांना धारेवर धरत जाब विचारला.

सकाळी अकरा वाजता सुरू झालेला आढावा सायंकाळी सात वाजेपर्यंत चालला.यात प्रत्येक विभागातील योजनानिहाय पाढा समितीने वाचला.सुरुवातीपासून आक्रमक राहिलेले समिती सदस्य शेवटपर्यंत प्रत्येक विभाग प्रमुखांचे कान उपटत होते.ज्या काही गंभीर बाबींवर समितीकडून बोट ठेवण्यात आले.त्या प्रत्येक मुद्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न सीईओ ठाकूर यांनी केला.काही त्रुटी असतील तर त्या वेळेत दुरुस्त करून समितीसमोर ठेवल्या जातील,त्यासाठी काही कालावधी देण्याची विनंती समितीसमोर सीईओ ठाकूर यांनी केली.

पंचायत राज समिती सदस्यांनी प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेली औषध खरेदीबाबत आवाज उठविला. नियम तोडून खरेदी कशी काय होऊ शकते,यावर समितीने आरोग्य विभागावर जोरदारपणे ताशेरे मारले.त्याचसोबत महिला व बाल कल्याण विभागाने खरेदी केलेल्या सायकल खरेदीबाबत आयएएस मार्कचा विचार का केला गेला नाही,यावर खडेबोल
सुनावले.

समितीने पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, रेकॉर्ड का दाखविले नाही,यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.तसेच ग्रामपंचायतमधील परस्पर साहित्य खरेदीवरून गटविकास अधिकाऱ्यांचा पांडाल पाडला. साहित्य खरेदी करताना दरपत्रक का मागविले नाही.असा सवाल करत गट विकास अधिकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांनी हजेरी घेतली.
—–
समिती सदस्य अपेक्षेपेक्षा आक्रमक
समिती सदस्य फार झालं सो ऍण्ड सो आढावा घेतील असे अधिकाऱ्यांना वाटले.मात्र हा अधिकाऱ्यांचा अंदाज पूर्णपणे फोल ठरला,असून आजच्या आढावा बैठकीत एकाही अधिकाऱ्यांची समितीने गय केली नाही.अधिकाऱ्यावर समिती सदस्य तुटून पडल्याचे बघायला मिळाले.त्यामुळे दोन दिवस अधिकाऱ्यांना जीव भांड्यात ठेवून समितीच्या आक्रमकतेचा मुकाबला करावा लागणार आहे.
——
उधा पंचायत समिती भेटी
पंचायत राज समिती उधा टीम तयार करून पंचायत समिती अंर्तगत विविध गावामधील विविध कामांची पाहणी करणार आहेत.यात कारवाईची बडगा उगारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
——-
तत्कालीन अधिकारी दिवसभर ताटकलून
आजच्या झालेल्या सन 2016-17 लेखा परिक्षा पुनर्विलोकन अहवालात काही त्रुटीवरून तत्कालीन अधिकाऱ्यांना बोलवू शकतात.त्यामुळे अधिकाऱ्यांना हजेरी लावणे क्रमप्राप्त असते.मात्र आजच्या आढावा बाबत एकाही तत्कालीन अधिकाऱ्यास बोलविले गेले नाही.यात बरेच अधिकारी हे सेवानिवृत्त झालेले आहेत. हे अधिकारी नियोजन भवन येथे तळ ठोकून होते.